भुयारी गटार योजना या विभागाअंतर्गत शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावणेकरिता शहरात आवश्यकतेनुसार विविध व्यासाच्या सांडपाणी वाहुन नेणेकरिता पाईप गटार टाकण्यात येते. तसेच शहरातील नविन विकसित भागात सुध्दा पाईप गटार टाकण्यात येते. सदरचे सांडपाणी विविध मलशुध्दिकरण केंद्रात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरविलेल्या मानंकानुसार प्रक्रिया करुन नाल्याद्वारे नदीत सोडण्यात येते. त्याचप्रमाणे शहरात टाकण्यात आलेल्या पाईपगटारींची दैनंदिन साफसफाई करणेत येते.
भुयारी गटार योजना या विभागामार्फत पाईप गटारींची दैनंदिन साफसफाई करणेत येते. परंतु तरीही सार्वजनिक पाईपगटारीचे चोक अप असल्यास व रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्यास संबंधित विभागाचे भुयारी गटार योजनेचे उप अभियंता त्याच प्रमाणे मनपा मुख्यालय (राजीव गांधी भवन) येथे संपर्क साधुन आपली तक्रार नोंदवु शकतात संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत
राजीव गांधी भवन - १४५/२५७३१५१
उप अभियंता भुगयो (नविन नाशिक) - ९४२३१७९१५८
उप अभियंता भुगयो (पुर्व) - ९४२३१७९१५९
उप अभियंता भुगयो (पश्चिम) - ९४२३१७९१६२
उप अभियंता भुगयो (पंचवटी) - ९४२३१७९१८८
उप अभियंता भुगयो (सातपुर) - ९४२३१७९१५०
उप अभियंता भुगयो (ना.रोड) - ९४२३१७९१४९
नाशिक शहराचा वाढता विकास व लोकसंख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता विविध ठिकाणी मलशुध्दीकरण केंद्रे व सिवेज पंपींग स्टेशन बांधण्यात येत आहेत. यात मुख्यत्वेकरुन विविध ठिकाणी १६३ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलशुध्दीकरण केंद्रे ३०० द.ल.ली. क्षमतेचे सिवेज पंपींग स्टेशन बांधण्यात येत आहे.
शहरातील सांडपाणी शुध्दीकरण करणेकामी तपोवन व चेहेडी येथे युएसबी या तंत्रज्ञानाचा वापर करुन अनुक्रमे ७८ द.ल.ली. व २२ द.ल.ली. क्षमतेचे तसेच पंचक येथे ७.५० द.ल.ली. क्षमतेचे Acivated Sludge Process या तंत्रज्ञानाचा वापर करुन मलशुध्दीकरण केंद्र व त्या अनुषंगीक ६ ठिकाणी सिवेज पंपींग स्टेशन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. व नाशिक शहरात सांडपाणी वाहुन नेणेकरिता साधारणतः १४०० किमी पाईप गटारींचे जाळे टाकण्यात आलेले आहेत.