NMC

मिशन विघ्नहर्ता - 2021

गणेश उत्सवा संदर्भातील महत्वाची माहिती.

 • राज्यशासनाची मार्गदर्शक तत्वे
 • ऑनलाइन स्लॉट बुकिंग
 • टॅंक ऑन व्हील
 • अमोनियम बायकार्बोनेट
 • ऑनलाईन दर्शन
 • ऑनलाइन श्रींच्या मूर्ती
 • पर्यावरण पुरक गणेशोत्त्सव स्पर्धा

ऑनलाइन स्लॉट बुकिंग

कोविड 19 चा प्रादूर्भाव लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाशिक महानगरपालिलेच्या वतीने या गणेश उत्सवात नागरिकांच्या सोयीसाठी व गोदाप्रदूषण रोखण्यासाठी फॉक्सबेरी टेक्नोलॉजी प्रा. ली. यांच्या साह्याने ऑनलाईन स्लॉट बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्लॉट बुकिंग सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक महानगरपालिलेच्यावतीने करण्यात आले आहे.

ऑनलाईन स्लॉट बुकिंगचे फायदे :

 1. नागरिकांना त्यांच्या वेळेनुसार व जवळील गणेश विसर्जन स्पॉट निवडता येणार आहे.
 2. स्लॉट बुकिंग करून गणेश विसर्जन केल्यामुळे नदी पात्राजवळ गर्दी होणार नाही व सर्वांना गणेश विसर्जन वेळेत करता येणार आहे.
 3. स्लॉट बुकिंग सुविधेमुळे आपल्या गोदमाईचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
 4. जास्तीत जास्त नागरीकांनी या स्लॉट बुकिंग सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅंक ऑन व्हील

नाशिक महानगरपालिकेचा एक अभिनव उपक्रम : " टॅंक ऑन व्हील "


अधिनिक तंत्रज्ञाचा वापर करून यावर्षी मनपा " टॅंक ऑन व्हील " हा एक अभिनव उपक्रम नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी घेऊन येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिककर मनपा येतेय तुमच्या दारी, करू नका बाहेर गर्दी सारी !

 

मनपा एका सोसायटीमध्ये ५० पेक्षा जास्त घरे असतील अश्या सोसायटीमध्ये मूर्ती संकलन करण्यासाठी मनपाने पूर्ण तयारी केली आहे. चला तर मग आजच आपल्या सोसायटीच्या गणेश विसर्जनाची माहिती मनपाला देऊन सहकार्य करूया ! गणेश विसर्जन करूया !


टॅंक ऑन व्हीलचे फायदे :


मनपाला या उपक्रमाच्या माध्यमातून आपण या कोविड काळात कोरोना संसर्ग वाढण्यापासून वाचवू शकतो व तिसऱ्या लाठेला येण्यापासून आपण वाचवू शकतो. नागरिकच्या सुरक्षेची खबरदारी लक्षात घेता व फिजिकल अंतर राखण्यासाठी सुद्धा या उपक्रमाच्या माध्यमातून मनपाला सहकार्य होणार आहे. हा उपक्रम नदी प्रदूषण टाळण्यासाठी व गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून सुरु करण्यात आला आहे.

या उपक्रमातुन नदी प्रदूषण तर टाळता येईल पण शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यास सुद्धा सहकार्य होणार आहे.

अमोनियम बायकार्बोनेट

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी घरगुती उपाय...!


प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती विसर्जन, नद्या, तलाव आणि विहिरी प्रदूषित करतात.

 1. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही.
 2. मूर्तींचे अंशतः बुडलेले तुकडे मोठ्या प्रमाणात नद्यांचे झरे बंद करू शकतात.
 3. मूर्तींसाठी वापरल्या जाणाऱ्या पेंट्समुळे सागरी जीवांना हानी पोहोचते आणि पाणी प्रदूषित होते.
 4. मूर्तींच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो.

हे टाळण्याचा काही मार्ग आहे का?

होय आहे! - आपण ते घडवू शकता!


CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन प्रक्रिया आणली आहे!


गणेश मूर्ती विसर्जनासाठी ....

पर्यावरणपूरक उपाय पाळा, गोदामाई प्रदूषण टाळा !!!


फायदे :

 1. मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण रोखणे
 2. द्रव अवशेष वनस्पतींसाठी खत म्हणून वापरले जाऊ शकतात
 3. कॅल्शियम कार्बोनेटचे अनेक वापरकर्ते (गाळ) जे उप-उत्पादन आहे
 4. अंमलबजावणी करणे खूप सोपे आहे

हे सोपे आणि सुरक्षित आहे - आपण ते घरी सहज करू शकता !!

प्लास्टर ऑफ पॅरिस (कॅलिकम सल्फेट) पाण्यात विरघळत नाही.

विस्तृत संशोधन आहे अमोनियम वापरून पीओपी गणेश मूर्ती पाण्यात विरघळवण्यासाठी सोपा उपाय

बायकार्बोनेट (बेकिंग सोडा)

 1. पेहली स्टेप : एक बादली घ्या ज्यामध्ये मूर्तीचे पूर्ण विसर्जन करता येईल.ते पाण्याने भरा आणि अमोनियम बायकार्बोनेट पावडर जोडा गणेश मूर्तीच्या वजनाइतकाच घ्या.
 2. दुसरी स्टेप :गणेशमूर्तीमधून निर्माल्य आणि इतर सजावटीच्या वस्तू काढा.त्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये तयार केलेल्या द्रावणात गणेश मूर्तीचे विसर्जन करा.
 3. तिसरी स्टेप:प्रत्येक 2 ते 3 तासांनी मिश्रण हलक्या हाताने हलवा.साधारण 48 तासात गणेश मूर्ती पूर्णपणे विसर्जित होईल.गाळ, जो कंटेनरच्या तळाशी स्थायिक होतो तो कॅल्शियम कार्बोनेट आहे.
 4. चौथी स्टेप :डावा द्रव अमोनियम सल्फेट आहे जो एक लोकप्रिय खत आहे आणि वनस्पती आणि लॉनला पाणी देण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

चला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया !!!

महत्वाची माहिती :ही इको-फ्रेंडली प्रक्रिया घरी आणि मंडळांमध्ये मूर्तींसाठी लागू केली जाऊ शकते.

ऑनलाईन दर्शन

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना त्यांच्या आवडीच्या बाप्पाचे दर्शन व्हावे याकरिता नाशिक महानगरपालिकेच्यावतीने नाशिक मधील मानाच्या गणेश मंडळांचे ऑनलाइन दर्शनची सुविधा मनपाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे., तरी नागरिकांनी या कोविडच्या काळात बाहेर येऊ नये व कोविड संसर्ग वाढेल असे काही करू नये व मनपाला सहकार्य करावे.

ऑनलाइन दर्शन सुविधेचे फायदे :

 1. कोविड -१९ कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
 2. गणेश मंडळ ठिकाणी गर्दी कमी होईल.
 3. गणेश उत्सवाच्या काळात सर्व मानाच्या गणेश मंडळांचे दर्शन व आरती आपणास घरी बसूनच पाहता येणार आहे.

ऑनलाइन श्रींच्या मूर्ती

पर्यावरण पुरक गणेशोत्त्सव स्पर्धा

या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

स्पर्धाची नियमावली:

 1. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना
 2. पर्यावरणपूरक सजावट आणि रंगांचा वापर
 3. विसर्जन घरी किंवा ऑनलाईन स्लॉट बुकिंग सुविधेचा वापर करूनच करायला हवं!

३ स्पर्धकांना मनपाच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार आहे.

 • पहिले बक्षीस: र.रु. १०,०००/-
 • दुसरे बक्षीस: र.रु. ५,०००/-
 • आणि तिसरे बक्षीस: र.रु. ३,०००/- असणार आहेत

ही तिन्ही बक्षिसे गणेश उत्सव कमिटी द्वारे संबंधित व्यक्तीला संपर्क करून त्यांचे पडताळणी करून निश्चित करण्यात येईल.

"पर्यावरणपुरक गणेश स्पर्धा" या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना:

 • गणेश मूर्ती लाल माती, शाडू माती,पेपर, मार्बल, कॅम्फर व इत्यादीपैकी असणे आवश्यक आहे.
 • गणेशोत्सवाची सजावट पर्यावरण पुरक असणे गरजेचे आहे.
 • गणेश मूर्ती रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरलेले असली पाहिजे.
 • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी स्लॉट बुकिंगचा किंवा टॅंक ऑन व्हीलचा वापर करूनच गणेश विसर्जन करणे अनिवार्य आहे.
 • या स्पर्धेत तीन विजेत्यांची निवड करून त्यांना मा. आयुक्तसाहेब यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
 • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाना त्यांनी हा गणेश उत्सव पर्यावरण पुरक का साजरा केला व समाजासाठी काही संदेश द्यायचा असेल तर ते देऊ शकतात.
 • पर्यावरण पुरक गणेश मूर्ती बसवलेली असेल तर त्याचा एक फोटो, सजावट, रंगाचा फोटो पाठवणे बंधनकारक आहे.
 

Last updated on : 17/09/2021 17:55:28 Friday