NMC Logo
NMC

Solid Waste Management

लाड पागे समिती शिफारशीनुसार दिवंगत / सेवानिवृत्त सफाई कर्मचारी यांचे वारसांना नियुक्ती देणेबाबत निवड समिती बैठक इतिवृत्त

सर्व साधारण कामाचे स्वरुप

१. शहरातील सार्वजनिक ठिकाणांची साफ़सफ़ाई व स्वच्छता करणे.
२. शहरातील घरोघरचा व रस्त्याच्या कडेचा घनकचरा संकलन व वाहतुक करणे.
३. शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन.
४. डांस व किटकजन्य आजार नियंत्रण.
५. मोकाट व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करुन उत्पत्ती थांबविणे.
६. अन्न भेसळ प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करणे.
७. मा. शासन निकषाप्रमाणे संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान राबविणे.
८. शहरातील वैद्यकीय व्यवसायात निर्माण होणाया जैविक कचयाची विल्हेवाट करणे.
९. मनपा प्राधिकृत अमरधाममध्ये मोफ़त अंत्यसंस्कार योजना राबविणे.
१०. मृत जनावरे व बेवारस मृतदेहांची विल्हेवाट करणे.
११. जन्म मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी कामकाज.
१२. प्रदुषण नियंत्रणाबाबत कार्यवाही करणे व पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल तयार करणे.

नागरिकांसाठी उपयुक्त माहीती

 

  • १. साफ़सफ़ाई व स्वच्छता : शहरातील १,८६९ कि. मी. लांबीच्या रस्त्यांची, मोकळी मैदाने, सार्वजनिक ठिकाणे, भाजीमार्केट्स ई. ची दररोज १,९९३ सफ़ाई कर्मचायांमार्फ़त स्वच्छता करणेत येते.
  • २. घनकचरा व्यवस्थापन : महानगरपालिका क्षेत्रातील हद्दीत संपुर्ण राज्यात अभिनव असलेला घंटागाडी प्रकल्प राबविण्यात येऊन महानगरपालिकेचे १०८ वॊर्डातील सुमारे २.९ लक्ष घरातुन व रस्त्यांच्या कडेचा केरकचरा दररोज १२४ मनपा मालकीच्या घंटागाडी वाहनांद्वारा संकलित करुन मनपाचे खत प्रकल्पावर रवाना करण्यात येतो. खत प्रकल्पावर केरकचयाचे रुपांतर खतामध्ये करणेत येऊन त्याची विक्री करणेत येते. या प्रकल्पाद्वारे संपुर्ण शहर कचरा कुंडी मुक्त करण्यास, शहर स्वच्छ व पवित्र ठेवण्यास महत्वाचे ठरले आहे. नाशिक मनपाला उत्कृष्ट घनकचरा नियोजना बद्दल \"क्रिसील\" या मान्यवर संस्थेकडुन सन २००३ वर्षाकरीता राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमकांचे बक्षीस मिळालेले आहे.
  • ३. शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन : महानगरपालिका क्षेत्रात शौचालयाचे व्यवस्थापन उत्तमरितीने रहावे म्हणुन संपुर्ण लोकसहभाग मिळवुन शौचालय \"पैसा द्या व वापरा\" या तत्वावर उपलब्ध आहेत. शौचालय देखबाल, निगा, दुरुस्ती योग्य प्रकारे राखली जाते. महानगरपालिका क्षेत्रात एकुण ५५६६ सिट्स उपलब्ध असलेले शौचालये असुन त्यामध्ये पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी अनुक्रमे २८२० व २७४३ सिट्सचा समावेश आहे. यापैकी ११९४ सिट्स पे एण्ड युज तत्वावर चालविणेत येत असुन २७१२ सिट्स मनपा सफ़ाई कामगार द्वारा स्वच्छता व देखबाल करणेत येतात. तसेच सुलभ इंटरनॆशनल मार्फ़त १६६० सिट्स साफ़सफ़ाई व देखबाल करणेत येतात. यामध्ये शौचालयाची गुणवत्ता ठेवण्यासाठी पुरेसे पाणी, विद्युत पुरवठा, चांगल्या प्रतीचे बांधकाम, स्वच्छतेसाठी फ़िनाईल उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
  • ४. डांस व किटकजन्य आजार नियंत्रण : पावसाळा कालावधीत चिकुनगुनीया/डेंग्यू यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. पावसाळा व त्यानंतर पुढील काही दिवस वरील साथींसाठी जोखमीचे असतात. याकरीता नागरीकांचे आरोग्य हिताचे दृष्टिने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना उपयुक्त आहेत. जेणे करुन चिकुनगुनीया/डेंग्यू या आजारांस प्रतिबंध करणे शक्य होईल. - \"चिकुनगुनीया/डेंग्यू\" ताप हा \"एडीस एजिप्टाय\" या डांसामार्फ़त होतो. या डासांची उत्पत्ती सात दिवसांपेक्षा जास्त काळ साठवलेल्या घरघुती पाणी साठे, सिमेंटच्या टाक्या, रांजण, बॆरल, होद इ. ठिकाणी होते. चिकुनगुनीया/डेंग्यू (विषाणुजन्य) तापाची लक्षणे. अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजणे, उल्टी होणे, प्रसंगी अंगावर पुरळ येणे, त्वचा लालसर होणे इत्यादी. - या तापाचा प्रसार रोखण्यासाठी नागरीकांनी खालील प्रमाणे उपाययोजना करावी:
    • पाण्याचे सर्वसाठे उदा. टाक्या , बेरल, हौद, रांजण, कुलर, ओव्हर हेड टॆंक्स इत्यादी आठवड्यातून किमान एक वेळा स्वच्छ करुन घासुन पुसुन कोरडे करावेत.
    • घरातील सर्व पाणी साठ्यांना हवाबंद झाकण बसवावे किंवा पातळ स्वच्छ कपड्याने बांधुन ठेवावे जेणेकरुन डांस आत जाऊन पाण्यावर अंडी घालणार नाही.
    • कुलर, फ़्रीज, फ़ुलदाणी यामधील पाणी आठवड्यात बदलावे.
    • भंगार निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी अथवा त्यामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.(उदा. निकामी टायर्स, फ़ुटके डबे, फ़ुटके माठ, फ़ुटकी भांडी, प्लॆस्टीकच्या बादल्या इ.)
    • आठवड्यातुन एका ठराविक दिवशी घरतील पाण्याचे सर्व साठे, माठ, रांजण, सिमेंटची टाकी इ. रिकामे करुन धुवुन कोरडे करावे. (कोरडा दिवस पाळावा) व नंतरच त्यात नवीन पाणी भरावे.
    • डासांचा उपद्र्व टाळण्यासाठी घर व परीसर स्वच्छ ठेवावा.
    • बंगल्यावरील सिंटेक्स टाक्या व पाण्याचे अंडरग्राउंड हौद आठवड्यातुन एकदा कोरडे करुन भरावेत व ते कायम झाकुन ठेवावेत.
    • इमारतीमधील बेसमेंट मध्ये पाणी साचु देऊ नये.
    • कायमस्वरुपी पाणी साठणार्‍या ठिकाणी डांस अळीभक्षक गप्पी मासे सोडावेत.
    • जमीनी खालील हौद, परीसरातील डबकी बुजवावीत. डबक्यावर रॊकेल किंवा ऒइल टाकावे.
    • आरोग्य कर्मचारी घरी आल्यानंतर सर्व पाणी साठे दाखवुन ऐबेट अळीनाशक औषधी टाकण्यास सहकार्य करावे व मार्गदर्श्न घ्यावे.
    • ताप आल्यानंतर ताबडतोब रुग्णांनी नजीकच्या रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत.
    • झोपतांना किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.
  • ५. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण: नाशिक महानगरपालिका ह्द्दीतील भटक्या व मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे कामी डॊग स्कॊड व डॊग व्हॆन साहायाने मोकाट कुत्र्यांना पकडुन त्यांचेवर शस्त्रक्रिया करणेत येते. दिनांक १५.१०.२००७ ते माहे मे २०१० पावेतो ७८३२ नर श्वान तर ६७१३ मादी श्वान अशा एकुण १४५७५ मोकाट श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणेत आली आहे.
  • ६. अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग :अन्न भेसळ प्रतिबंधक विभागामार्फ़त जनतेला सुरक्षित खाद्यपदार्थ व अन्न मिळण्याचे द्रुष्टीने व अन्न भेसळ टाळण्यासाठी अन्न निरीक्षकांद्वारे फ़ुड / ब्रेवरीज एस्टॅब्लीशमेंटची नियमित नमुने घेणेत येतात. तसेच प्लास्टीक वापर प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यात येते. शहरातील विविध अन्न अस्थापनांकडील प्लास्टीक पिशव्यांची तपासणी करुन ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास त्या जप्त करणेत येऊन संबंधीताविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करणेत येते. याकामी एकुण ४ अन्न निरीक्षक कार्यरत आहेत.
  • ७. संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान: शासन निर्णयानुसार महापालिका क्षेत्रात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छ्ता अभियान दरवर्षी राबविणेत येते. नाशिक महानगरपालिकेला संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान अंतर्गत २००३-२००४ या वर्षासाठी द्वितीय पुरस्कार मा. महाराष्ट्र शासनाकडुन प्राप्त झालेला आहे. सन २००६-०७ करीता सिडको विभागास स्वच्छ पार्षद वॉर्डाचे र.रु५लक्ष प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक मिळालेले आहे.यावर्षि देखिल मनपा क्षेत्रात सदर अभियान राबविणेत येत आहे. तसेच सन २००७-२००८ मध्ये राबविलेल्या संत गाडगे बाबा नागरी स्वच्छ्ता अभियानांतर्गत स्पर्धेच्या राज्यस्तरीय फ़ेरीमध्ये १ (१० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका) मधुन नाशिक महनगरपालिकेस राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मा. शासनाकडुन प्राप्त झाला आहे.
  • ८. जैविक कचरा विल्हेवाट प्रकल्प: पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेतर्फ़े शहारामध्ये तयार होणारा बायोमेडीकल वेस्ट याची आरोग्य दृष्ट्या योग्य विल्हेवाट लावण्यासाठी माहे नोव्हेंबर २००१ पासुन मुंबई आग्रारोड लगत कन्नमवार ब्रिजशेजारी बायोमेडीकल वेस्ट प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तेथे शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांकडील जैविक कचरा प्रदुषण नियंत्रण नियमानुसार नष्ट केला जातो. सदर प्रकल्पात सर्व प्रकारचे जैविक कचरा निर्माण करणारे हॉस्पीटल्स, क्लिनीक, लॅब, रक्तपेढी सभासद नोंदणीकृत करुन त्यांना सदरची सेवा दिली जाते.
  • ९. मोफ़त अंत्यसंस्कार योजना: नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील हद्दीमध्ये होणार्‍या मृतदेहांचे दहन अंत्यसंस्कारासाठी शह्रतील प्राधिकृत मोक्षधाम / अमरधाम येथे मोफ़त दहन अंत्यसंस्कार साहित्य पुरविणेत येते.
  • १०. मृत जनावरे विल्हेवाट: नाशिक मनपा हद्दीतील सर्व मृत जनावरे यांची विल्हेवाट लावणेचे काम आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांमार्फ़त केले जाते. त्या कामी ऍनिमल इनसेनिटर प्रकल्प चालु करणेबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच आरोग्य विभागामार्फ़त बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावणेचे कामकाज करणेत येते.
  • ११. जन्म मृत्यु कामकाज : नाशिक मनपा हद्दीतील जीवंत जन्म व मृत व्यक्तीचे नोंदणीचे काम आरोग्या विभागाच्या अखत्यारीतील सहा विभागिय कार्यालयांमार्फ़त करणेत येत असुन संबंधीतांना जन्म व मृत्युचे प्रमाणपत्र वाटप करणेत येते. तसेच काही विशिष्ट प्रसंगी शासन आदेशानुसार मोफ़त जन्म प्रमाणपत्र वाटप करणेत येते.
  • १२. विवाह नोंदणी: मा. शासनाने जन्म आणि मृत्यु नोंदणी यंत्रणेच्या धर्तीवरच विवाह नोंदणीसाठी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत विवाह नोंदणीचे कामकाज स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दिनांक १ मार्च २००७ पासुन हस्तांतरीत केले आहे. त्यानुसार नाशिकमहानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ०१.०४.२००७ ते ३१.०३.२०१० अख्रेर एकुण ८५८४ विवाह नोंदणी करणेत आली आहे.
  • १३. प्रदुषण नियंत्रण: महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे नियमावली अधीन राहुन शहरातील वातावरण प्रदुषणरहीत राखणेबाबत दक्षता घेणेत येते. तसेच मनपाचे खत प्रकल्प येथील परिसराचे नियमित प्रदुषण मापन करणेत येऊन दरवर्षी पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल तयार करणेत येतो.
  • १४. घंटागाडी तक्रार निवारण कक्ष (मुख्य कार्यालय): नाशिक महानगरपालिका हद्दीतील घंटागाडी भागात उशिरा येणे, भागात कचरा गोळ करणेसाठी अनियमित येणे, संपुर्ण कचरा गोळा न करणे इ. स्वरुपाच्या तक्रारी मुख्या कार्यालयास प्राप्त होत असतात. या तक्रारींचे त्वरीत निवारण करणे आवश्यक बाब असल्याने त्याबाबत कार्यवाही करणे गरजेचे असल्याने आरोग्य मुख्यालयात याकामी एक स्वतंत्र पथक नेमणेत आले आहे. या पथकाद्वारे आलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणेस मदत झाली आहे.

 

महत्वाचे सुरु असलेल प्रकल्प

१. केरकचरा संकलन व वाहतुक
२. अळीनाशक फ़वारणी
३. भटके व मोकाट कुत्रे निर्बीजीकरण
४. जैविक विल्हेवाट प्रकल्प
५. \"घरोघरी घनकचरा विभक्तीकरण\"

पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यरत आंतरराष्ट्रीय संस्था जी.टी.झेड. मिनिस्ट्री ऑफ़ अर्बन डेव्हलपमेंट (मौद) व वन, पर्यावरण मंत्रालय (मोएफ़) केंद्रशासनामार्फ़त नाशिक महानगरपालिकेतील घन्कचरा व्यवस्थापन नियम २०००संदर्भात तंतोतंत अंमलवजावणी करणेकामी तांत्रिक सहाय्य करीत आहे.

त्या अनुषंघाने \"घरोघरी घनकचरा विभक्तीकरण\" हि संकल्पना अंमलबजावणी करणेच्या दृष्टीकोनातुन जी. टी. झेड व नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ एप्रिल २०१० रोजी नाशिक महानगर पालिका येथे कार्यशाळा आयोजित करणेत आली. सदर कार्यशाळेचे उदघाटन मा. श्री. सतीश खडके साहेब, उपआयुक्त यांच्या हस्ते करणेत आले.

सदर कार्यशाळेस डॉ. रेगिना दुबे, सिनियर ऍडव्हायझर, जी.टी.झेड व डॉ. कोंडीराम एच. पवार, आरोग्या वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेत घनकचर्‍याचे घरोघरी मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या प्रकारे विभक्तिकरण करणे व त्या पध्दतीने घनकचरा संकलीत करणेच्या द्रूष्टीकोनातुन करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करणेत येऊन कृती आराखडा तयार करणेत आलेला आहे.

नियमित होणाया महत्वाच्या घडामोडीची माहीती

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या दिनांक २७.०८.२००८ च्या मा. आयुक्त साहेब मनपा, नाशिक यांना अग्रेषित मार्गदर्शन सुचनांन्वये नाशिक शहर परिसरांत सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान नागरीकांचे गर्दी टाळणे व एकाच ठिकाणी होणारे नदी प्रदुषण टाळणेकरीता नदीकाठी २५ ठिकाणी तात्पुरती विसर्जन / मुर्ती दान केंद्रे स्थापन केली जातात. या वेळी ज्या गणेश मुर्ती दान करणेत येतात, त्या पुर्वनिश्चित केलेल्या ठिकाणी (विहीरी / खाणी) विसर्जित करणेत येतात.

इतर आवश्यक माहीती

नाशिक महानगरपालिका, नाशिक आरोग्य विभागांतर्गत मलेरिया विभागाचे काम करणेत येते. मलेरिया विभागामध्ये महानगरपालिका कर्मचारी व पेस्ट कंट्रोल (ठेकेदार) कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने डांस निर्मुलन मोहिम राबविणेत येते. यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे एकुण 53 कर्मेचारी व पेस्ट कंट्रोल ठेकेदाराकडील 238 कर्मेचारी कार्यरत आहे. असे एकुण दररोज 291 कर्मचारी डांस निर्मुलन योजनेचे काम करतात. डांस नियंत्रण कार्यांतर्गत दैनंदिन कंटेनर तपासणी, डांस अळीनाशक फ़वारणी, शहरातील नदी - नाले वाहते करणे त्यांमध्ये डांस उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नयेत याकरीता पाणीसाट्यांत गप्पीमासे सोडणे, पानवेली काढणे, तणनाशक कार्यवाही, किरकोळ अभियांत्रिकी कार्यावाही अंतर्गत तत्सम कामे समाविष्ट आहेत. याबरोबरच मनपा कार्यक्षेत्रातील सहाही विभागांत नियोजनानुसार विभागनिहाय वॉर्डात धुर फ़वारणी केली जाते त्याचप्रमाणे मा. नगरसेवक व इतर तातडीचे बाब म्हणुन मागणी केले नुसार धुर फ़वारणी केली जाते. 

सदरची कामे ही नियमीतपणे चालु असतात. याकरीता 170 नॅपसेक फ़वारणी पंपाद्वारे औषध फ़वारणी केली जाते. डासोत्पती आढळुन आलेल्या ठिकाणी, नद्या, नाले, वाहते करण्यासाठी व पानवेली काढणे इ. किरकोळ अभियांत्रिकी कामाकरीता चॉपर, कोयते, पंजे व नद्यांमध्ये 2 बोटीचा वापर केला जातो त्याचप्रमाणे धुर फ़वारणी करीता 38 हॅंडफ़ॉगिंग मशिन व 6 माऊंटव्हेइकल मशिनद्वारे शहरामध्ये धुर फ़वारणी केली जाते. 

याव्यतिरिक्त मलेरिया विभागामार्फ़त मनपा कार्यक्षेत्रातील झोपडपट्टींची निवड करुन सदर झोपडपट्टीत मलेरिया व इतर किटकजन्य रोग सर्व्हेक्षण मोहिम राबविणेत येते. मलेरिया विभागामार्फ़त पावसाळा नंतर करावयाची कामे याबाबत संबंधीतांना सुचित करुन व तशा प्रकारचे कामाचे नियोजन करुन डांस नियंत्रण करणे करीता कार्यवाही केली जाते. मनपा कार्यक्षेत्रातील जनतेमध्ये डेंग्यु, मलेरिया, चिकुनगुन्या यांसारख्या रोगाविषय़ी व त्यावर नियंत्रणाकरीता जनजागृतीच्या माध्यमातुन स्थानिक टि.व्ही व रेडीओ चॅनेल लाऊडस्पीकर, आरोग्य रथ, पोस्टर्स, पत्रके, स्टीकर्स, गटसभा, वर्तमान पत्र इ. मार्फत द्रूक-श्राव्य प्रबोधन केले जाते. 

मनपाच्या सहाही विभागांमध्ये स्वतंत्र मलेरियाचे युनिट स्थापन केलेले आहे. त्यावर नियंत्रणाकरीता सहा वरिष्ट क्षेत्र कार्यकर्ता, दोन मलेरिया सुपरवाईझर, एक जिवशास्त्रज्ञ व आरोग्य वैद्यकिय अधिकारी नियंत्रण ठेवतात.

 
Last Updated
16-04-2024 11:10:25 Tuesday