गुणनियंत्रण विभाग

विभागाचे नाव  गुणनियंत्रण विभाग
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री.नितीन करसन पाटील
पद  कार्यकारी अभियंता
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ९४२२२२८४३
ई-मेल आयडी  qualitycontrol@nmc.gov.in
विभागाचे कामकाज १.गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कामकाज मा.आयुक्त महोदय यांचे अधिपत्याखाली करण्यात येते.
२.प्रयोगशाळेत प्राप्त झालेल्या सिमेंट, वाळु, विटा, सिमेंट काँक्रीट क्युब्स, सिमेंट काँक्रीट बिम, सिमेंट काँक्रीट कोर, सिमेंट काँक्रीट पेव्हर ब्लॉक्स, डांबरीकरणाच्या कामाचे नमुने, मॅनहोल कव्हर्स, ईत्यादी विविध बांधकाम साहित्याच्या नमुन्यांची चाचणी.
३.विविध चाचणी अहवाल तयार करणे व संबंधित कार्यकारी अभियंता यांना सादर करणे.
४.नागरी विकास कामांच्या स्थळांना Random भेट देणे, विनिर्देशानुसार सर्वसाधारणपणे तपासणी करणे व संबंधित कार्यकारी अभियंता यांना अहवाल सादर करणे.
५. अदायगीसाठी सादर केलेल्या देयकांना मंजुरी देणे.
६.आवश्यकतेनुसार मनपाच्या तांत्रीक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.
७.त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरिक्षण (थर्ड पार्टी टेक्नीकल ऑडीट) करण्यासाठी महापालीकेच्या विविध विभागांना मदत करणे.



केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती