पर्यावरण विभाग

विभागाचे नांव पर्यावरण विभाग
श्री.नितीन सुकदेव पवार श्री.नितीन सुकदेव पवार
पद उपआयुक्त
मोबाईल नंबर ९५९४३०३५७७
ईमेल आयडी ee_env@nmc.gov.in, eeenv2@gmail.com
विभागाचे कामकाज महाराष्ट्र् महानगरपालिका अधिनियम चे कलम ६७-अ अन्वये व मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट केंद्र सरकार यांच्या प्राप्त सुचनेनुसार महानगरपालिका यांना पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल (इनव्हायरलमेंट स्टेटस रिर्पोट) तयार करणे तसेच भारतीय राज्य घटनेच्या ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार अहवाल जनहितार्थ प्रसिध्द करणे बंधनकारक आहे.
नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात हवा प्रदूषण, जल प्रदूषण, टाकाऊ घनपदार्थामुळे होणारे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, इ. सर्व बाबींचे वेळोवेळी मापन करुन त्यानुसार अहवाल तयार करणे, तसेच सदरचा अहवाल मा. महासभेच्या अवलोनार्थ सादर करणेत येतो. सदर पर्यावरण स्थिती दर्शक अहवाल तयार करणेसाठी जाहिर निविदा प्रसिध्द करुन त्याव्दारे अर्हता प्राप्त व न्युनतम मक्तेदाराकडून पर्यावरण स्थिती दर्शक अहवाल तयार करुन घेणेत येतो.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP अंतर्गत वायू प्रदूषण, भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने देशभरातील वायू प्रदूषण कमी करणे करीता NCAP चे लक्ष्य सन २०२६ पर्यंत PM 10 आणि PM 2.5 प्रदूषक 20% ते 30% कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नाशिक शहरातील शुद्ध हवा कार्यक्रम अंमलबजावणी व नाशिक शहरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी याकरिता अनेक उपाय योजना २०१९ पासून राबवित आहे. याकरिता शहरात वायु प्रदूषण कमी करणे उद्दिष्ट गाठण्यासाठी रस्त्याच्या कडेच्या हरित पट्ट्यांचा विकास, हरित भिंती, दुभाजक व वाहतूक बेट हरितीकरण, विद्युत शवदाहिनी, स्विपींग मशीन, सी & डी प्लांट, इ व्ही चार्जिंग स्टेशन, इ. करून शहरातील वायू प्रदूषण कमी करणे व जास्तीत जास्त सौर ऊर्जेस चालना देऊन शास्वत ऊर्जा विकास निर्माण करण्यासाठी पर्यावरण विभाग कार्यकरीत आहे.



केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती

Environment Department ESR Reports

NMC ESR 2019-2020

NMC ESR 2020-2021

NMC ESR 2021-2022

NMC ESR 2022-2023