विभागीय अधिकारी, नाशिक रोड

विभागाचे नाव  नाशिकरोड विभागीय कार्यालय
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री.चंदन ठकाजी घुगे
पद  विभागीय अधिकारी
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ८८८८३२४८४९
ई-मेल आयडी  do_nashikroad@nmc.gov.in
विभागाचे कामकाज 1) नाशिकरोड विभागाचे सर्व प्रशासकीय कामकाज मा.आयुक्त सो. व मा.उपआयुक्त सो. यांच्या अधिपत्याखाली करण्यात येते.
2) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दैनंदिन रस्त्यांची व शौचालयांची साफ-सफाई करण्यात येते.
3) मालमत्ता व पाणीपट्टी कर विभागामार्फत नागरीकांना करांचे देयके वाटप करण्याचे काम व कर वसुलीचे कामकाज करण्यात येते.
4) नागरीकांनी केलेल्या अर्जा प्रमाणे दिलेल्या मुदतीत त्यांना जन्म-मृत्यु व विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.
5) विविध करांचे नागरी सुविधा केंद्रामार्फत कर संकलन करण्यात येते.
6) अतिक्रमण विभागामार्फत नाशिकरोड विभागातील अनाधिकृत अतिक्रमण धारकांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येते.
7) मनपाचे गाळे, ओटे व बाजार वसुली यांची विविधकर विभागामार्फत वसुली करण्यात येते.
8) स्लम परिसरातील स्लमपट्टीची वसुली स्लम विभागामार्फत करण्यात येते.
9) सार्व.बांधकाम विभागामार्फत नविन रस्ते, पावसाळी गटार बनविणे व देखभाल दुरुस्तीचे कामकाज करण्यात येते.
10) मलनिस्सारण विभागामार्फत नविन मलवाहीका टाकणे व देखभाल दुरुस्तीचे कामकाज करण्यात येते.
11) पाणीपुरवठा विभागामार्फत नविन पाण्याची लाईन टाकणे व देखभाल दुरुस्तीचे कामकाज करण्यात येते.
12) विद्युत विभागामार्फत नविन लाईटचे पोल टाकणे व देखभाल दुरुस्तीचे कामकाज करण्यात येते.
13) उद्यान विभागामार्फत नविन उद्याने विकसीत करणे व देखभाल दुरुस्तीचे कामकाज करण्यात येते.
14) नाशिकरोड विभागामार्फत नागरीकांना व विद्यार्थ्यांना ग्रंथालय विभागामार्फत आवश्यक ते पुस्तके व पेपर वाचण्याची सोई उपलब्ध करुन देण्यात येते.