गोदावरी संवर्धन कक्ष

  • मुख्य पृष्ठ
  • उच्च न्यायालयाचे आदेश
  • समित्या
  • Div Commr बैठकीचे इतिवृत्त
  • उप कॉम.मीटिंगचे इतिवृत्त
  • नीरी अहवाल शिफारसी
  • स्मार्ट सिटी अहवाल
  • STP चा चाचणी अहवाल
  • तक्रारी
  • घनकचरा व्यवस्थापन विभाग
  • शिक्षण विभाग (जागरूकता)
  • गोदावरी गाणे

गोदावरी संवर्धन कक्षात आपले स्वागत आहे

समित्या

गोदावरी प्रदुषण जनहित याचिका क्र. 176/2012 मुख्य समिती

      1. मा. विभागीय आयुक्त, नाशिक,अध्यक्ष
      2. मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका नाशिक
      3. मा. जिल्हाधिकारी नाशिक
      4. मा. पोलिस आयुक्त, नाशिक
      5. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
      6. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नाशिक
      7. मा. शिक्षण उप संचालक, नाशिक
      8. मा. मुख्याधिकारी देवळाली, छावनी नाशिक
      9. मा. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक (MPCB)
      10. मा. अधिक्षक अभियंता व प्रशासन (CADA), नाशिक
      11. मा. अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग नाशिक
      12. मा. मुख्य अभियंता, निर्मिती नाशिक औष्णिक विद्युतकेंद्र एकलहरे, नाशिक
      13. मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ (MIDC) नाशिक
      14. मा. उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय नाशिक
      15. मा. जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
      16. मा. उपसंचालक, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नाशिक
      17. मा. डॉ. राकेश कुमार, मुंबई (NEERI)
      18. मा. डॉ. प्राजक्ता बस्ते, प्राचार्य आर्किटेक्चर कॉलेज, नाशिक
      19. मा. सहसंचालक नगररचना नाशिक
      20. मा. श्री. राजेश पंडीत - याचिकाकर्ते
      21. मा. श्री. निशिकांत पगारे - याचिकाकर्ते

गोदावरी प्रदुषण जनहित याचिका क्र. 176/2012 उपसमिती सदस्य

      1. मा. आयुक्त, मनपा, नाशिक अध्यक्ष
      2. मा. निरी (NEERI) चे प्रतिनिधी
      3. मा. पोलीस उप आयुक्त, नाशिक
      4. मा. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
      5. मा. माहिती उपसंचालक, नाशिक
      6. मा. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, नाशिक
      7. मा. अतिरिक्त आयुक्त, (सेवा/ शहर) मनपा, नाशिक सचिव
      8. मा. अधीक्षक अभियंता, साआअ (मलनिः) मनपा, नाशिक निमंत्रीत सदस्य
      9. मा. अधीक्षक अभियंता, यांत्रिकी, मनपा, नाशिक निमंत्रीत सदस्य
      10. मा. संचालक, घनकचरा व्यवस्थापन, मनपा, नाशिक निमंत्रीत सदस्य
      11. मा. श्री. राजेश पंडित अशासकीय सदस्य
      12. मा. श्री. निशिकांत पगारे अशासकीय सदस्य

सर्व उपसमित्यांचे कार्य

१.आयुक्त महानगरपालिका नाशिक स्तरावरील उपसमिती

      1. आयुक्त महानगरपालिका नाशिक- अध्यक्ष
      2. NEERI चे प्रतिनिधी
      3. पोलीस उपायुक्त, नाशिक
      4. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
      5. माहिती उपसंचालक, नाशिक
      6. जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नाशिक
      7. राजेश पंडीत }अशासकीय सदस्य
      8. निशिकांत पगारे}अशासकीय सदस्य
      9. अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका सचिव

उपसमितीची कार्यकक्षा उपसमितीने महानगरपालिकेशी संबंधित खालील सर्व नमुद विषयांचे नियंत्रण करावयाचे आहे.

      1. मा. उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या NEERI च्या अहवालातील सर्व शिफारशीची अमलबजावणी करणे.
      2. गंगापूर येथील STPs साठीची जमीन त्यासंबंधी नाशिक महानगरपालिका यांनी वरीष्ठ न्यायालयात दाखल केलेले अपिल निकाली झाल्याने सदर जमिनीचे संपादन सहा महिन्यात पुर्ण करणे.
      3. नाशिक महानगरपालिका यांनी विभागीय आयुक्त यांचे आवश्यकते नुसार समिती करीता सचिव तसेच इतर कर्मचारी कायमस्वरुपी उपलब्ध करणे.
      4. नाशिक महानगरपालिका यांनी समितीचे सदस्य यांना स्थळ पाहणी करीता वाहनांची सुविधा उपलब्ध करणे.
      5. नाशिक महानगरपालिका यांनी समितीस आश्यक असलेली स्टेशनरी, संगणक तसेच प्रिंटर उपलब्ध करणे.
      6. नाशिक महानगरपालिका आयुक्त यांनी NEERI यांनी वेळोवेळी मागणी केल्या प्रमाणे त्यांना रक्कम अदा करणे.
      7. गंगापूर आणि पिंपळगांव खांब येथील जमीनीचे संपादन करतांना नाशिक महानगरपालिका यांनी आवश्यक त्या नुकसान भरपाई च्या रक्कमेचा भरणा जिल्हाधिकारी / संबंधित महसूल अधिकारी यांचेकडेस आदेश केल्यावेळी करणे व या प्रकल्पांची उभारणी करण्यावर देखरेख ठेवणे.
      8. NEERI यांनी दि. ५/७/२०१३ रोजी दाखल केलेल्या अहवालाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची शिफारस यापूर्वीच मे. न्यायालयाने केलेली आहे त्यानुसार कार्यवाही करणे.
      9. नाशिक महानगरपालिका यांना निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी त्यांचे संकेत स्थळावर NEERI यांचे सर्व अहवाल तसेच न्यायालयाचे संबंधित आदेश यांच्या प्रती तसेच सदर आदेशांचे मराठी भाषांतर अपलोड करणे.
      10. मे. न्यायालयाने स्थापित केलेल्या समितीने बॅरिकेटस चे महत्व लक्षात घेवून गोदावरी नदी जवळील परिसरात वाहनांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्याची कायमस्वरुपी उपाययोजना करणे.
      11. महानगरपालिका आणि राज्य सरकार यांनी कार्यवाही करुन गोदावरी नदीचे पात्र आणि नदीच्या पात्रालगतचा परिसरातील अनधिकृत बांधकामाचे निष्कावण करणे.
      12. समितीने नियुक्त केलेल्या NEERI अथवा इतर तज्ञ संस्था यांची फि/खर्च महानगरपालिका यांनी अदा करणे.
      13. महानगरपालिका यांनी समितीस (कार्यालय, कर्मचारी, संगणक इ. सर्व) आवश्यक पायाभूत सुविधा पुरविणे.
      14. मे उच्च न्यायालयाचे आदेशान्वये स्थापित केलेल्या समितीने गोदावरी नदी संबंधीचे नियमांचे उल्लघन प्रदूषण, अतिक्रमन, अनाधिकृत बांधकाम तसेच सदर न्यायालयाचे आदेशांचे उल्लघनाबाबत माहिती सदर समितीस तक्रार, फोटो किंवा व्हॉटसअॅप किंवा पारंपारिक लेखी पध्दतीने कळविणेकामी नागरीकांना करीता तक्रार निवारण यंत्रणा स्थापित करावयाची आहे. त्याबाबत समितीने एक महिन्याचे आत आवश्यक कार्यवाही करावयाची आहे. तक्रार निवारण यंत्रणेची माहिती नाशिक महानगरपालिका यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध करणे.
      15. संकेत स्थळावर समितीची माहिती, संपर्काची माहिती, कार्यालयाचा पत्ता तसेच सदस्यांची नावे नमूद केलेली असावीत. NEERI व इतर तज्ञ संस्था यांचे अहवाल तसेच समितीच्या घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त आणि मे.न्यायालयात सादर केलेले कार्यवाही केल्याबाबतचे अहवाल यांच्या प्रती संकेत स्थळावर उपलब्ध करणे.
      16. सदर तक्रारींचे अभिलेख जतन करणे.
      17. सदर समितीने केलेली कार्यवाही सदर संकेत स्थळावर तक्रार दिल्याचे तीन आठवडयांचे आत अपलोड करावयाची आहे. निनावी तक्रारीची देखील दखल घ्यावयाची आहे याबाबत कार्यवाही करणे.
      18. नाशिक महानगरपालिका यांनी नागरीकांचे मूलभूत हक्कबाबत व्यापक जागृती मोहीम तयार करुन आणि त्यांचे अंमलबजावणी करावयाची आहे. तसेच शाळा, महाविदयालय यांचेमध्ये सदर मोहिम राबविणे.
      19. नाशिक महानगरपालिका यांनी अशासकीय संस्था, महाविदयालये यांची मदत घेवून सार्वजनिक जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
      20. नाशिक महानगरपालिका यांनी विधी महाविद्यालय तसेच जिल्हा कायदेविषयक सेवा प्राधिकरण यांची मदत घेवून कार्यशाळा व पथनांटये आयोजित करुन सार्वजनिक जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
      21. नाशिक महानगरपालिका यांनी पुरेशा मापाचे जाहीरात फलक महत्वाचे स्थळावर लावून सार्वजनिक सदस्यांना कचरा किंवा इतर कोणत्याही वस्तू नदीमध्ये न टाकणेबाबतचे आवाहन करणे व त्याची अमलबजावणी करणे.
      22. नाशिक महानगरपालिका यांनी नियमीत मानवनिर्मीत तळे तयार करुण त्यामध्ये राख आणि निर्माल्य तसेच इतर धार्मीक वस्तू, साहित्य यांचे विसर्जन त्यामध्ये करावयाचे आहे. त्याबाबतचा प्रचार करुन मानव निर्मीत तळे निमन केले बाबत जाहिरात फलक लावून, माहिती देवून व त्यांचा वापर करणे बाबत नागरिकांना कळकळीची विनंती करणे.
      23. त्याच प्रमाणे गणेश विसर्जनाच्या वेळी आणि नवरात्री चे वेळी दुर्गामुर्तीचे विसर्जनासाठी तात्पुर्ते मानवनिर्मीत तळे यांची निर्मीती करावयाची आहे. सदर मानवनिर्मीत तळे तयार केले बाबत ची माहीती नागरीकांना देवून सदर तळयांचा जास्तीत जास्त वापर करणे बाबत आवाहन करणे.
      24. नाशिक महानगरपालिका यांनी मूर्तीचे संकलन नागरीकां कडून करावे. सदर मुर्तीचे विसर्जन नाशिक महानगरपालिका यांनी प्रदूषण न होता करण्याची कार्यवाही करणे. २६. नाशिक महानगर पालिका यांनी गोदावरी नदी परिसरात मोठ्या आकाराचे कचरा संकलन
      25. कुंडी यांची व्यवस्था करुन कचरा नियमीत गोळा करावयाचा आहे
      26. त्याच प्रमाणे निर्माल्य यांचे संकलन करणे कामी मोठया आकाराचे कलश उपलब्ध करावयाचे आहे. सर्व संकलन केलेले कचरा व साहित्य पर्यावरण पूरक आणि काळजीपूर्वक नष्ट करणे.
      27. कुंभमेळा आणि इतर मोठया धार्मीक उत्सवांचे वेळी नाशिकमहानगर पालिका यांनी माहिती फलक व जाहिरात फलल शहरातील विविध भागात तसेच शहरात येण्याच्या वेगवेगळ्या प्रवेश मार्गावर लावून प्रवासी व यात्रेकरु यांना गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवणे हे पवित्र काम असलेबाबत आवाहन करावयाचे आहे. सदरचे फलकाव्दारे कचरा व इतर धार्मीक निर्मील्य वस्तू गोदावरी नदी मध्ये न फेकने बाबतचा निर्देश केलेला असावा.
      28. सदर फलकाव्दारे गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्याबाबतच्या प्रयत्नांची माहिती तसेच न्यायालयाचे आदेश व निर्देशांची माहिती नमूद करणारे फलक लावणे.
      29. नियमांचे उल्लघंन करणा-यांना विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन सदर फलकाव्दारे करावे. सदरचे फलक मराठी आणि हिंदी भाषेत असावेत. सदरचे फलक संपूर्ण वर्षभर महत्वाच्या स्थळावर दर्शनीय ठिकाणी लावण्याची कार्यवाही करणे.
      30. गोदावरी संवर्धन विभागासाठी स्वतंत्र व समर्पित कर्मचारी वर्गासाठी कार्यवाही करणे.
      31. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयातील सर्व निर्देशानुसार कार्यवाही करणे.

२. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्तरावरील उपसमिती

      1. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ- अध्यक्ष
      2. पपोलीस उपायुक्त, नाशिक
      3. NEERI चे प्रतिनिधी
      4. सहायक संचालक, नगररचना, महानगरपालिका
      5. अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
      6. राजेश पंडीत अशासकीय सदस्य }अशासकीय सदस्य
      7. निशिकांत पगारे }अशासकीय सदस्य
      8. उपप्रादेशिक अधिकारी, महानगरपालिका नाशिक- सचिव

उपसमितीची कार्यकक्षा - उपसमितीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित खालील सर्व नमुद विषयांचे नियंत्रण करावयाचे आहे.

      1. NEERI यांनी दि. करण्याची शिफारस ५/७/२०१३ रोजी दाखल केलेल्या अहवालाबाबत तातडीने कार्यवाही यापूर्वीच मे. न्यायालयाने केलेली आहे. त्यानुसार नाशिक महानगरपालिका, MIDC, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी सदर शिफारशींचे अंमल बजावणी आणि पूर्तता आज पासून दोन महिन्यात करणे.
      2. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मे. न्यायालयाचे दि. २०.८.२०१३ रोजी चे आदेशान्वये दहा प्रदूषण विषयक नियम न पाळणा-या उद्योजकाविरुध्द कार्यवाही केल्याचे अहवाला वरुन दिसते आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी अशा प्रदूषण करणा-या उद्योजकाविरुध्द नियमीत कार्यवाही करणे.
      3. कलम ४९ अन्वये पाणी (प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण) कायदा १९७४ अन्वये गोदावरी नदी संदर्भात आलेल्या तक्रारीबाबत कार्यवाही करावी.
      4. प्रदूषण करणा-या संस्था व कंपन्या यांची आकस्मात तपासणी करणे.
      5. महानगरपालिकेचे सर्व मत्सनिस्सारण केंद्र, एमआयडीसी व इतर ठिकाणातून निर्माण होणा-या दूषित पाण्याचे तपासणी नियमितपणे करणे व तपासण्यांचा दर्जाबाबत खातरजमा करणे.
      6. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयातील सर्व निर्देशानुसार कार्यवाही करणे.

३. जिल्हापरिषद स्तरावरील उपसमिती

      1. मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष
      2. NEERI चे प्रतिनिधी
      3. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
      4. राजेश पंडीत - अशासकीय सदस्य
      5. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता जिल्हा परिषद - सचिव

उपसमितीची कार्यकक्षा- उपसमितीने जिल्हापरिषदाशी संबंधित खालील सर्व नमुद विषयांचे नियंत्रण करावयाचे आहे.

      1. गोदावरी नदीचे प्रदूषणाबाबत नदीचे लगतच्या आठ गावे, चांदोरी, सायखेडा, ओढा, एकलहरे, लाखलंगाव, संसारी या ठिकाणी निर्माण होणा-या घनकचरा व नदीत मिसळणारे सांडपाणी यांचेवर प्रक्रिया करण्याबाबत कालबध्द कार्यक्रम करणे.
      2. नदीलगतच्या गावामध्ये व स्वच्छतेबाबत व प्रदूषणाबाबत लोकजागृती करणे.
      3. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयातील सर्व निर्देशानुसार कार्यवाही करणे.

४. गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिध्दी स्तरावरील उपसमिती

      1. माहिती उपसंचालक अध्यक्ष
      2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
      3. अतिरीक्त आयुक्त, महानगरपालिका
      4. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता )
      5. शिक्षणाधिकारी (माध्यमिक
      6. निशिकांत पगारे
      7. जिल्हा माहिती अधिकारी नाशिक- सचिव

उपसमितीची कार्यकक्षा - उपसमितीने गोदावरी प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित खालील सर्व नमुद विषयांचे नियंत्रण करावयाचे आहे.

      1. नाशिक महानगरपालिका यांनी नागरीकांचे मूलभूत हक्कबाबत व्यापक जागृती मोहीम तयार करुन आणि त्यांचे अंमलबजावणी करावयाची आहे. तसेच शाळा, महाविदयालय यांचेमध्ये सदर मोहिम राबविणे.
      2. नाशिक महानगरपालिका यांनी अशासकीय संस्था, महाविदयालये यांची मदत घेवून सार्वजनिक जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
      3. नाशिक महानगरपालिका यांनी विधी महाविद्यालय तसेच जिल्हा कायदेविषयक सेवा प्राधिकरण यांची मदत घेवून कार्यशाळा व पथनांटये आयोजित करुन सार्वजनिक जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
      4. नाशिक महानगरपालिका यांनी पुरेशा मापाचे जाहीरात फलक महत्वाचे स्थळावर लावून सार्वजनिक सदस्यांना कचरा किंवा इतर कोणत्याही वस्तू नदीमध्ये न टाकणेबाबतचे आवाहन करणे व त्याची अमलबजावणी करणे.
      5. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयातील सर्व निर्देशानुसार कार्यवाही करणे.

५. महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ (MIDC) स्तरावरील उपसमिती

      1. अधिक्षक अभियंता महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ- अध्यक्ष
      2. प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
      3. NEERI चे प्रतिनिधी
      4. पोलिस उपायुक्त
      5. निशिकांत पगारे
      6. कार्यकारी अभियंता, MIDC, नाशिक सचिव
      7. एमआयडीसी नाशिक

उपसमितीची कार्यकक्षा - उपसमितीने महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाशी संबंधित खालील सर्व नमुद विषयांचे नियंत्रण करावयाचे आहे.

      1. NEERI यांनी दि. ५/७/२०१३ रोजी दाखल केलेल्या अहवालाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची शिफारस यापूर्वीच मे. न्यायालयाने केलेली आहे. त्यानुसार नाशिक महानगरपालिका, MIDC, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी सदर शिफारशींचे अंमलबजावणी आणि पूर्तता आज पासून करणे.
      2. सातपूर आणि अंबड येथील औदयोगिक विभागामध्ये CETP ची उभारणी करुन कार्यान्वित करणे.
      3. प्रदूषण विषयक नियमांचे उल्लंघन करणा-या उद्योजकांविरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी.
      4. एमआयडीसीचे हद्दीत निर्माण होणा-या दूषित पाण्यावर नदीपात्रात मिसळण्यापुर्वी मलनित्सारण करणेबाबत आवश्यक यंत्रणा उभारणेसाठी कार्यवाही करणे.
      5. मे. न्यायालया तर्फे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, औदयोगिक वापर करते यांचा CETPs खर्च उचलण्याची इच्छा नसेल, परंतू MIDC आवश्यक ते पाऊल उचलून CETPS लागू करावयाचा आहे. त्याबाबतचा अहवाल MIDC यांनी आज पासून तिन महिन्याचा आत सादर करावायाचा आहे.
      6. MIDC यांनी उभारलेले औदयोगिक क्षेत्र यांनी प्रदूषण आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांचे हनन करु नये हे MIDC यासाठी काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करणे.
      7. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयातील सर्व निर्देशानुसार कार्यवाही करणे.

वरीलप्रमाणे सर्व उपसमित्याची सरंचना व त्यांचे कार्य ठरविण्यात येत आहेत. या उपसमितीप्रमुख व सचिव यांनी उपसमित्यांची दरमहा बैठक घेण्यात यावी. उपसमितीने त्यांचेशी संबंधित सर्व विषयांचा आढावा नियमितपणे घ्यावा. यासाठी गोदावरी प्रदूषणाचे अनुषंगाने प्राप्त होणा-या तक्रारी यांचाही समावेश करण्यात यावा. या कामासाठी आवश्यक ते पाहणी दौरे करण्यात यावेत. उपसमिती दरमहा होणा-या कार्यवाहीचा अहवाल दर दोन महिन्याला मा. विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात यावा.

Smart City Report

नाशिक महानगरपालिकेचे अधिकृत गोदावरी गीत


Click to Play गोदावरी गीत


नाशिक महानगरपालिकेचे अधिकृत गोदावरी गीत, संकल्पना सुनीता धनगर यांची, संगीत गायन सुप्रसिद्ध संगीतकार गायक संजय गिते यांची, आणि शब्द रचना सुरेखा बोऱ्हाडे